महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष विभागा मार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.या गोष्टीचा विचार करून दिव्यांग/दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार उपकरणे/साधने पुरविण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली. या योजने द्वारा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांच्या अपंगत्वावर व त्यांना वयोमानानुसार त्यांना गरजेचे उपकरणे,साधने,योगउपचार इ साठी शासना मार्फत पात्र लाभार्थी व्यक्तीच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ वितरण (DBT) मार्फत एक रकमी 3 हजार रुपये मिळणार आहेत. Vayoshri yojana 2024 या योजने बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता,निकष आणि योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे याची माहिती दिलेले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना संपूर्ण माहिती | mukhymantri vayoshri yojana 2024
योजनेचे स्वरूप :-
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तींना खालील उपकरणे/साहित्य हे खरेदी करता येतील.
1) श्रवण यंत्र 2) चष्मा 3) ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर 4) फोल्डींग वॉकर 5) कमोड – खुर्ची 6) नि – ब्रेस 7) लंबर बेल्ट 8) सर्वाइकल कॉलर
मुख्यमंत्री योजना साठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड/ मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- स्वयंघोषणा पत्र
- शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष :-
- सदर योजने अंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नगरिकांनी दि. 31/12/2023 अखेर पर्यन्त वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील.) जर व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जर लाभार्थी व्यक्तींकडे आधार कार्ड नसेल,आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यास स्वीकारल्या जाईल.
- लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकारणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धाकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
- उत्पन्न मर्यादा :- लाभार्थी व्यक्तीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
- सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसाहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण/अकार्यक्षम उपकरणे इत्यादींचा बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
- पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रु 3000 /- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्रद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक (Invoice) प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (cpsu) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
- निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात, लाभार्थींच्या संख्यापैकी 30 टक्के महिला असतील.
आधिक माहितीसाठी पात्र अर्जदारानी संबंधित समाजकल्याण कार्यालयामध्ये संपर्क साधावा.