मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४|Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024

Mukhyamantri Tirth Darshan Yojana|

Mukhyamantri तीर्थ योजना संपूर्ण माहिती

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रराज्यात अनेक मोठे संत होऊन गेलेत.अनेक वर्षा पासून महाराष्ट्रा मध्ये वारकरी संप्रदाय हा अस्तित्वात आहे.भक्तीच्या मार्गावर अनेक वर्षा पासून लोक आपले धर्मकार्य,समाजकार्य करीत आहेत.तसेच संपूर्ण भरता मध्ये अनेक देव देवतांचे धार्मिक स्थळे आहेत.त्यामध्ये भारतातील हिंदू बांधव जसे कि, चारधम,अमरनाथ,माता वैष्णवदेवी यात्रा तसेच भारतातील इतर धर्मियांचे ही मोठी तीर्थस्थळे आहेत.या तीर्थस्थळांना भेट देण्याचा बहुतांश ज्येष्टनागरिकांचा मानस हा असतो. तीर्थस्थळाना भेट देणे हे एक शेवटचे स्वप्न/ ईच्छा ज्येष्टनागरिकांची असते. परंतु, आर्थिक कारणाने व प्रवासास सोबती कोणी नाही तसेच पुरेसी माहितीचा अभाव या कारनास्थ तीर्थस्थळी जाता येत नाही.तर ज्येष्टनागरिकांना तीर्थस्थळी जाता याव या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व धर्मीय ज्येष्टनागरिकांसाठी मोफत  महाराष्ट्र राज्य सरकारने "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४|Mukhyamantri Tirth Darshan Yojana " ही सुरु केली आहे. 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४|Mukhyamantri Tirth Darshan Yojana सविस्तर माहिती

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांन मधील ज्या व्यक्तीचे वय ६० वर्ष आहे.अश्या जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” ही मोफत सुरू करण्यात आली आहे.

योजनेचा मुख्य उद्देश :- राज्यातील जेष्ठनागरिकांना मोफत तीर्थ दर्शन करून देणे हा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” हा मुख्य उद्देश आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना २०२४ | योजनेची व्याप्ती

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये भारतातील व महाराष्ट्र राज्यातील तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.त्या तीर्थस्थळामध्ये वेळेप्रसंगी बदल हा होऊ शकतो त्या बाबत माहिती ही देण्यात येईल.तसेच ही यात्रा करण्यासाठी प्रती व्यक्ती ३०,०००/- रुपये इतका खर्च प्रवास,भोजन,निवास इ बाबींचा त्यात समावेश राहील. सदर योजनेचा लाभ हा एक व्यक्तीला एकाच तीर्थस्थळाला भेटण्यासाठी घेत येईल.

योजनेची व्याप्ती

योजनेचे लाभार्थी :- महाराष्ट्र राज्यातील ६० वर्ष वय व त्यावरील जेष्ठनागरिक

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची पात्रता

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • वय वर्ष ६० ते त्यावरील जेष्ठनागरिक
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची अपात्रता

  • लाभार्थी कुटुंबात कोणी आयकर भरणारे नसावे.
  • लाभार्थी कुटुंबात कोणी नियमित/कायम सरकारी विभाग,उपक्रम,मंडळ,भारत सरकार व राज्यसरकार मध्ये कार्यरत आहेत. किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहात. असे पात्र ठरणार नाहीत.तसेच ज्यांच उत्पन्न हे २.५ लाख पेक्षा कमी आहे ते कंत्राटी,स्वयंसेवी कर्मचारी असतील ते पात्र ठरतील.
  • कुटुंबातील कोणी आजी/माजी खासदार/आमदार असले तर ते अपात्र ठरतील.
  • कुटुंबातील कोणी भारतसारकर किंवा राज्यसरकारच्या बोर्ड,कॉर्पोरेशन,उपक्रमाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक,सदस्य असतील ते अपात्र ठरतील.
  • कुटुंबांच्या सदस्याच्या नावावर जर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत असेल तर ते अपात्र ठरतील.
  • प्रवासासाठी लाभार्थी हा शाररीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसला पाहिजेत. जसे कि टी. बी, हृदयाबाबत आजार,कुष्ठरोग,कोरोनरी आपुरेपणा,कोरोनरी थ्रोम्बोसिस,मानसिक आजार इ.
  • अर्जासोबत लाभार्थीला निरोगी आणि प्रवासाठी सक्षम असल्याचे वैदयकीय प्रमाणपत्र सादर कारावे लागेल.(प्रमाणपत्र हे प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवस जून नसावे.)
  • जे अर्जदार मागील लॉटरी पद्धतीने निवडलेले असतील पण त्यांना आमंत्रण देऊनसुद्धा त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही,आशा माजी अर्जदाराना या योजनेस पात्र ठरविले जाणार नाही.
  • अर्जदाराणे कोणत्याही प्रकारची खोटी माहिती सादर केल्यास त्यांना अपात्र ठरविले जाणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी लागणारे कागद पत्रे

  • योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे.
  • रेशनकार्ड / आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / जन्म दाखल ( आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास १५ वर्ष पूर्वीचे १.रेशनकार्ड २.मतदान कार्ड ३.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४.जन्म दाखल यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येईल.)
  • २.५ लाखचा सक्षमअधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला. (पिवळे/केशरी रेशन कार्ड सुद्धा चालेल.)
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जवळच्या नातेवाईकचा मोबाइल क्रमांक
  • सदर योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबत हमीपत्र

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजेनच्या प्रवासा बाबत

सदर योजनेच्या प्रवासबाबत बस प्रवास आयोजन करणाऱ्या विविध टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी नोंदणीकृत कंपनीची निवड ही निविदा मार्फत करण्यात येईल.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजेनच्या अर्जदारची निवड

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अर्जदारची निवड ही जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या समिती मार्फत केली जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या लोकसंख्या नुसार योजेनाचा कोटा हा ठरविण्यात येईल.

  • जिल्ह्याच्या ठरविलेल्या कोट्या पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास संगणककृत लॉटरी पद्धतीने अर्जदार हे निवडले जातील.
  • कोटयातील १००% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल.पात्र लभार्थीनी जर प्रवास न केल्यास त्याना वगळून प्रतीक्षा यादीतील व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना निवड यादी

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अर्जदारची निवड यादी व प्रतीक्षा यादी ही जिल्हा अधिकारी कार्यालय व समाज कल्याण सहाय्यक विभागाच्या फलकावर तसेच योग्य त्या ठिकाणी लावण्यात येईल व प्रसार मध्यमांवर जाहीर करण्यात येईल.

Mukhyamantri Tirth Darshan Yoajana 2024 I मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रवासाची प्रक्रिया

  • जिल्हास्तरीय समितीने निवडून दिलेल्या लाभार्थी प्रवाशांची यादी ही आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल.
  • निवडलेले प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल.
  • निवडलेले अधिकृत एजन्सी /टुरिस्ट कंपनी लाभार्थी प्रवाशांची असण्याची सुव्यवस्था करेल.
  • लाभार्थी प्रवाशांना प्रवासासाठी आवश्यक सुविधा त्या सुविधांपैकी कोणत्या सुविधा लाभार्थी प्रवाशांना देण्यात याव्यात याचा निर्णय पूर्णपणे राज्य शासनाकडे राहील.
  • लाभार्थी प्रवाशांना प्रवासासाठी नियोजित स्थळी हे आपल्या स्वखर्चाने पोहोचावं लागेल.
  • रेल्वे/ बसने प्रवास;-
    • जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्य बाबतची व्यवस्था सुनिश्चित केली जाईल.
    • प्रवास सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रवाशाला प्रवास मधूनच सोडून जायचं असेल, तर तशी कोणतीही सुविधा सरकारकडून दिली जाणार नाही, विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गे सोडण्याचे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांची परवानगी घेऊन प्रवासी स्वखर्चाने परतीचा प्रवास करू शकतात.

निवड यादी

  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र झालेल्या अर्जदारची यादी ही शासनाच्या पोर्टल वा संबंधीत विभागाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल.

भारतातील तीर्थ स्थळांची यादी

अ. क्र.मंदिराचे नावस्थान
1वैष्णवदेवी मंदिर, कटराजम्मू आणि काश्मीर
 2अमरनाथ गुहा, मंदिरजम्मू आणि काश्मीर
 3सुवर्ण मंदिर, अमृतसरपंजाब
 4अक्षरधाम मंदिरदिल्ली
 5श्री दिगंबर जैन लाल मंदिरदिल्ली
 6श्री लक्ष्मीनारायण मंदिरदिल्ली
 7श्री बद्रीनाथ मंदिरचमोली,उत्तराखंड
 8श्री गंगोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
 9श्री केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयागउत्तराखंड
 10श्री नीलकंठ महादेव मंदिर, ऋषिकेशउत्तराखंड
 11श्री यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
 12श्री बैद्यनाथ धाम, देवघरझारखंड
 13श्री काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसीउत्तर प्रदेश
 14श्री इस्कॉन मंदिर, वृंदावनउत्तर प्रदेश
 15श्रीराम मंदिर, आयोध्याउत्तर प्रदेश
 16श्री सूर्य मंदिर, कोणार्कउत्तर प्रदेश
 17श्री जगन्नाथ मंदिर, पुरीउत्तर प्रदेश
 18स्त्रीलिंगराज मंदिर, भुवनेश्वरउत्तर प्रदेश
 19श्री मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वरउत्तर प्रदेश
 20श्री कामाख्यादेवी मंदिर, गुवाघाटीउत्तर प्रदेश
 21श्री महाबोधीमंदिर, गयाबिहार
 22श्री रणकपुर मंदिर, पालीराजस्थान
 23अजमेर दर्गा, राजस्थानराजस्थान
 24श्री सोमनाथ मंदिर, वेरावळगुजरात
 25श्री द्वारकाधीश मंदिर, द्वारकागुजरात
 26श्री नागेश्वर मंदिर, द्वारकागुजरात
 27सांची स्तूप, सांचीमध्य प्रदेश
 228खजुराहो मंदिर, खजुराहोमध्य प्रदेश
 29श्री महाकालेश्वर मंदिर, उज्जैनमध्य प्रदेश
 30श्री ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरीमध्य प्रदेश
 31श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगमकर्नाटक
 32श्री गोमटेश्वर मंदिर, श्रवणबेळगोळकर्नाटक
 33श्री वीरूपाक्ष मंदिर, हम्पीकर्नाटक
 34श्री चेन्नकेशव मंदिर, बेलूरकर्नाटक
 35श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडूकर्नाटक
36श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्णकर्नाटक
 37श्री भूतनाथ मंदिर, बदामीकर्नाटक
 38श्री मरुडेश्वर मंदिर, मरुडेश्वरकर्नाटक
 39आयहोल दुर्गा मंदिर, आयहोलकर्नाटक
 40श्रीकृष्ण मंदिर, उडपीकर्नाटक
 41वीर नारायण मंदिर, बेलावडीकर्नाटक
 42तिरुपती बालाजी मंदिर, तिरूमलाकर्नाटक
 43श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलमआंध्र प्रदेश
 44श्री बृहद्दी श्रय मंदिर, तंजावरआंध्र प्रदेश
 45श्री मीनाक्षी मंदिर, मदुराईतामिळनाडू
 46श्री रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरमतामिळनाडू
 47श्री कांचीपुरम मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
 48श्री रंगनाथस्वामी मंदिर, त्रिचीतामिळनाडू
 49श्री अरुणाळेश्वर मंदिर, तिरुवन्नामलाईतामिळनाडू
 50कैलसनाथ मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
 51एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
 52सारंगपाणीमंदिर कुंभकोणमतामिळनाडू
 53किनारा मंदिर, महाबलीपुरमतामिळनाडू
 54मुरगन मंदिर, तिरूचेंदूरतामिळनाडू
 55श्री पद्मनाथस्वामी मंदिर, तिरुवनंतपुरमकेरळ
 56गुरुवायूर मंदिर, गुरुवायूरकेरळ
 57वडकुन्हाथन मंदिर, त्रिशूरकेरळ
 58पार्थसारथी मंदिर, अरणमुलाकेरळ
 59शबरीमाना मंदिर, पथनतिट्टाकेरळ
 60अट्टाकल भगवती मंदिर, तिरुवनंतपुरमकेरळ
 61श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायुरकेरळ
 62थिरुनेल्ली मंदिर, वायनाडकेरळ
 63वैकोम महादेव मंदिरकेरळ
 64तिरुवल्ला मंदिर, तिरुमल्लाकेरळ
 65शिवगिरि मंदिर, वर्कलाकेरळ
 66श्री सम्मेद शिखर्जी मंदिर (गिरिडीह)झारखंड
 67शत्रुनजय हिलगुजरात
 68गिरनारगुजरात
 69देवगड़उत्तर प्रदेश
 70पावापुरीबिहार
 71रणकपुरराजस्थान
 72दिलवाड़ा टेंपलराजस्थान
 73उदयगिरिमध्य प्रदेश

महाराष्ट्रातील तीर्थस्थळांची यादी

अ . क्र नावजिल्हा
 1सिद्धिविनायक मंदिरमुंबई
 2महालक्ष्मी मंदिरमुंबई
 3चैत्यभूमी दादरमुंबई
माउंट मेरी चर्च (वांद्रे)मुंबई
 5मुंबादेवी मंदिरमुंबई
 6वाळकेश्वर मंदिर मलबार हिलमुंबई
 7विश्व विपश्यना प्यायगोडा गोराईमुंबई
 8चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॉवेल  मुंबई
 9सेंड अँडरेयू चर्चमुंबई
10 सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च, सिपज्य औद्योगिक क्षेत्र अंधेरीमुंबई
 11सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च, मरोळमुंबई
 12गोदीजी पार्श्वंत मंदिरमुंबई
 13नेसेस एलियाहू सेनेगॉग फोर्टमुंबई
 14शर हरहमीम सिनेगौग, मज्जिद भंडारमुंबई
 15म्यागेन डेव्हिड सिनेगॉग, भायखळामुंबई
 16सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्चठाणे
 17अग्यारी / अग्निमंदिरठाणे
 18मयुरेश्वर मंदिर, मोरगावपुणे
 19चिंतामणी मंदिर, थेऊरपुणे
 20गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्रीपुणे
 21महागणपती मंदिर, रांजणगावपुणे
 22खंडोबा मंदिर, जेजुरीपुणे
 23संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, आळंदीपुणे
24भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेडा तालुकापुणे
 25संत तुकाराम महाराज मंदिर, देहूपुणे
 26संत चोखामेळा मंदिर, पंढरपूरसोलापूर
 27संत सावता माळी मंदिर, अरण तालुका माढासोलापूर
 28विठोबा मंदिर, पंढरपूरसोलापूर
 29शिखर शिंगणापूरसातारा
 30महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरकोल्हापूर
 31ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर  कोल्हापूर
 32जैन मंदिर, कुंभोजकोल्हापूर
 33रेणुका देवी मंदिर, माहूरनांदेड
 34गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब, नांदेडनांदेड
 35खंडोबा मंदिर, मालेगावनांदेड
 36श्री संत नामदेव महाराज देवस्थान उंब्रज तालुका कंधारनांदेड
 37तुळजाभवानी मंदिर, तुळजापूरधाराशिव
 38संत एकनाथ समाधी, पैठणछत्रपती सांभाजीनगर
 39घृशनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळछत्रपती सांभाजीनगर
 40जैन स्मारके एलोरा, लेणीछत्रपती सांभाजीनगर
 41विघ्नेश्वर मंदिर, ओझरनाशिक
 42संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर जवळनाशिक
 43त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वरनाशिक
 44मुक्तिधामनाशिक
 45सप्तशृंगी मंदिर वनीनाशिक
 46काळाराम मंदिरनाशिक
 47जैन मंदिरे मांगीतुंगीनाशिक
 48गजपंतनाशिक
 49संत साईबाबा मंदिर, शिर्डीअहमदनगर
 50सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेकअहमदनगर
 51शनीमंदिर, शनिशिंगणापूरअहमदनगर
 52श्री क्षेत्र भगवानगड, पाथर्डीअहमदनगर
 53बल्लाळेश्वर मंदिर, पालीरायगड
 54संत गजानन महाराज मंदिर, शेगावबुलढाणा
 55एकविरा देवी, कारलापुणे
 56श्री दत्त मंदिर, औदुंबरसांगली
 57केदारेश्वर मंदिरबीड
 58वैजनाथ मंदिर, परळीबीड
 59पावसरत्नागिरी
 60गणपतीपुळेरत्नागिरी
 61मार्लेश्वर मंदिररत्नागिरी
 62महाकाली देवीचंद्रपूर
 63श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिरसातारा
 64अष्टभुज रामटेकनागपूर
 65दीक्षाभूमीनागपूर
 66चिंतामणी कळंबयवतमाळ

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनसाठी अर्ज कुठ करावा ?

जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज करता येईल. आपल्या जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागात या बाबत चौकशी करावी. तसेच खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा अर्ज डाउनलोड करावा .

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज लिंक :-

https://t.me/apaliyojana